सांगोला तालुकाशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल एक उत्कृष्ट शाळा-मुख्याधिकारी श्री. सुधीर गवळी.*

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल नेहमीच शालेय अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षांचेही मार्गदर्शन करते व विविध उपक्रम सतत राबवते.  सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम ही एक उत्कृष्ट शाळा आहे असे प्रतिपादन सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. सुधीर गवळी यांनी केले. सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल येथे सायन्स ऑलिंपियाड फौंडेशन यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या नॅशनल सायन्स ऑलिंपियाड, इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिंपियाड व इंटरनॅशनल मॅथेमॅटीक्स ऑलिंपियाड परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री.म.शं.घोंगडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. सरिता कापसे, प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री.उदय बोत्रे,पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर तसेच पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरूवातीस कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला. पुढे बोलताना श्री. गवळी म्हणाले की,स्पर्धा परीक्षांचे ज्ञान विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे या दृष्टीने विद्यालयाचे शिक्षक चांगली मेहनत घेतात व प्रयत्न करतात हे सांगत शिक्षक-विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले व भविष्यात वेगवेगळे उपक्रम राबवावेत असे सांगितले.
             यावेळी डॉ. स्मिता गव्हाणे, डॉ. अजिता स्वामी,स्नेहाली गायकवाड, रूपाली कापसे,श्री. विनोद खंदारे सर व श्री.अमोल बाबर या पालकांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यालयाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले व विद्यालयाचे कौतुक केले. या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विभाग प्रमुख व सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
                या परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण 416विद्यार्थी समाविष्ट होते. यामध्ये इंग्रजी विषयासाठी 148,सायन्स विषयासाठी 103 व गणित विषयासाठी 165 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.त्यामधील 72विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले व 14विद्यार्थ्यांची  SOF च्या सेकंड लेवलसाठी निवड झाली.
           संस्थाध्यक्ष श्री. प्रबुध्दचंद्र झपके सर, सचिव म. शं. घोंगडे, सहसचिव श्री. प्रशुध्दचंद्र झपके साहेब, खजिनदार श्री. शं. बा. सावंत, कार्यकारिणी सदस्य श्री. विश्वेश झपके व सर्व संस्थासदस्यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. या परीक्षेसाठी विभाग प्रमुख म्हणून कु. आरती फुले यांनी काम पाहिले.
          हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिपाली बसवदे यांनी केले तर शेवटी कु. पल्लवी थोरात यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!