सांगोला तालुका

जवळे येथे श्री.नारायण देवास अभिषेक व महादेवास जलाभिषेक कार्यक्रम संपन्न.

जवळे(प्रशांत चव्हाण) मौजे जवळे येथील श्री.नारायणदेव मंदिर येथे श्री.नारायण देवास गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी यावर्षी पडलेला दुष्काळ निवारण होण्यासाठी जवळे येथील ग्रामस्थांनी मिळून पहाटे पाच वाजता अभिषेक केला व दुपारी चार वाजता गावातील महिलांनी एकत्रित येत डोक्यावर जल भरलेल्या घागरी व तुळशी वृंदावन घेऊन गावातून मिरवणुकीने मंदिरात जाऊन श्री.महादेवास जलाभिषेक केला. सामुदायिक आरती होऊन देवास दुष्काळ निवारण्यासाठी शक्ती देण्याची विनंती केली.
सदर कार्यक्रमात श्री.नारायणदेव पुरुष व महिला भजनी मंडळ तसेच श्री.नारायण देवाची व श्री.सिद्धनाथाची पालखी तसेच बाल वारकरी पताका व टाळ मृदंग घेऊन तसेच गावातील ग्रामस्थ, युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक सामील झाल्याने कार्यक्रमाची शोभा वाढली होती.त्यानंतर गावातील भाविक भक्तांच्या मदतीने सर्वांना महाप्रसादाचे वाटप केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!