सांगोला तालुका

सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतनमध्ये गुणवंतांचा सन्मान संपन्न ;          महिलांच्या हळदीकुंकू समारंभाने तांदूळ महोत्सवाची सांगता 

सांगोला प्रतिनिधी….. सांगोल्याच्या वैभवात भर घालणाऱ्या व अल्पावधीतच नावारूपास आलेल्या आणि तब्बल बेचाळीस हजार स्क्वेअर फुटाचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे खरेदी दालन असलेल्या सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन मध्ये  विविध क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या तालुक्यातील काही गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यामध्ये पीएसआय पदावरती कार्यरत असलेले व बामणी या गावचे सुपुत्र भारत प्रकाश पांढरे यांची नुकतीच डीवायएसपी म्हणून पदोन्नती झालेली आहे.  प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असलेले विश्वंभर लवटे यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली. मेडशिंगी गावचे सुपुत्र सर्वश्री पंकज दत्तात्रय पवार यांची महाजनको मध्ये सहाय्यक रसायनशास्त्र वर्ग 2 पदी निवड, विनायक भागवत सोनलकर यांची दुय्यम निबंधक पदी निवड तर अमोल सुनील नश्टे यांची विस्तार अधिकारी पदी निवड झाली. सांगोला येथील माधुरी विलास डोंगरे यांची टीसीएस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून निवड झाली. तसेच बाळासाहेब लेंडवे यांची मेडशिंगी गावच्या उपसरपंच पदी निवड झाली. या सर्व गुणवंतांचा सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन मध्ये समारंभ पूर्वक सन्मान करण्यात आला. यावेळी सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक व एल के पी मल्टीस्टेट चे चेअरमन अनिलभाऊ इंगवले, सूर्योदय अर्बनचे चेअरमन जगन्नाथ भगत, सूर्योदय दूध विभागाचे चेअरमन डॉ. बंडोपंत लवटे , एलकेपी मल्टीस्टेटचे व्हॉ. चेअरमन सुभाष दिघे त्याचबरोबर सुभाष अनुसे, नानासाहेब पवार, कवडे साहेब , आनंद स्वामी, अजित काळुंगे, रणजीत शिंदे यांच्यासह मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जगन्नाथ यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले. तर नूतन डीवायएसपी भारत पांढरे यांनी सत्कारमूर्तींच्या वतीने मनोगत व्यक्त केले.  सूर्योदय मॉल आणि वस्त्रनिकेतन च्या वतीने मकर संक्रांत सणानिमित्त खास महिलांसाठी दिवसभर हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते.
यामध्ये शहर व परिसरातील सुमारे सातशेहून अधिक महिलांनी मोठ्या प्रमाणावरती उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.  मॉलमध्ये गेल्या दहा-बारा दिवसांपासून अनेकविध नमुने असलेल्या तांदूळ महोत्सवाची सांगता आजच्या या हळदी कुंकू समारंभाने संपन्न झाली. लग्न बस्त्याची खास सोय, सर्व प्रकारच्या साड्या, कपड्यांमधील संपूर्ण व्हरायटी त्याचबरोबर किराणा ,भुसार, फुटवेअर ,प्लास्टिक ,भांडी , खेळणी अशा विविध वस्तूंनी समृद्ध असलेल्या या मॉलमध्ये व्यवसायाच्या पलीकडे जाऊन विविध उपक्रमांनी ग्राहकांशी सातत्याने  नाते जोडले जात असल्यामुळे ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!