सांगोला महाविद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी
सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयात साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त्, त्यांच्या प्रतिमेस दि.01
ऑगस्ट 2024 रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांनी लोककला आणि साहित्याच्या माध्यमातून उपेक्षितांचे
दुःख चव्हाटयावर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकमान्य टिळकांचे
स्वातंत्र्य काळातील योगदान अत्यंत महत्वाचे होते. तसेच त्यांच्या जीवनातील प्रसंग व कार्याची
माहिती देवून विदयार्थ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा विचारांचे अवलोकन करावे असे मत
महाविद्यालयाचे प्रा. संतोष् लोंढे यांनी सांगितली.
महाविदयालयातील या कार्यक्रमाचे आयोजन आय.क्यु.ए.सी. कोऑर्डीनेटर डॉ. राम पवार
यांच्या मागदर्शनाखाली डॉ. अमोल पवार व श्री. बाबासो इंगोले यांनी केले तसेच अधिक्षक श्री. प्रकाश
शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसह विदयार्थी उपस्थित होते.