सांगोला तालुका

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील व परिवाराच्या सांत्वनासाठी गुरुवारी खा. शरदचंद्रजी पवार जवळा येथे..!

सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्याच्या राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असणार्‍या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांचे गेल्या महिन्यात दुःखद निधन झाले होते. यामुळे साळुंखे पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा. केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्रजी पवार यांचा साळुंखे पाटील परिवाराशी विशेष स्नेह असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील तसेच संपूर्ण साळुंखे पाटील कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देण्यासाठी गुरुवार दि 27 रोजी स.10 वा. सांगोला तालुक्याच्या दौर्‍यावर येणार आहेत.
जवळा येथील साळुंखे पाटील परिवाराची खा.शरदचंद्र पवार यांच्यावर आणि संपूर्ण परिवारावर असलेली निष्ठा सर्वश्रुत आहे. सोलापूर जिल्ह्यातील खा.शरदचंद्र पवार यांचा एक विश्वासू शिलेदार म्हणून मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची सर्वत्र ओळख आहे. शिवाय खा.शरदचंद्र पवार यांचे साळुंखे पाटील परिवाराशी कौटुंबिक सबंध आहेत.
स्वर्गीय ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या गेल्या महिन्यात झालेल्या दुःखद निधनानंतर साळुंखे पाटील परिवाराप्रती संवेदना व सहवेदना व्यक्त करण्यासाठी गुरुवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी स.10 वा. खा.शरदचंद्र पवार आपल्या हेलिकॉप्टरद्वारे जवळा ता. सांगोला येथील मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या निवासस्थानी पोहचणार आहेत येथील सांत्वनपर भेटीनंतर खा. शरदचंद्रजी पवार आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरअध्यक्ष तानाजीकाका पाटील यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!