सांगोला तालुकाराजकीय

वासूद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या जयश्री केदार यांची निवड;

सांगोला (तालुका प्रतिनिधी): वासूद ग्रामपंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व असून वासूद गावाच्या सर्वांगीण व चौफेर विकासासाठी कटिबध्द आहे. गावातील रस्ते, वीज, पाणी, स्वच्छ्ता गावचा विकास साधण्यासाठी विविध विकास कामांबरोबरच आरोग्य व शैक्षणिक सुविधा उत्तम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरपंच, उपसरपंच यासह सदस्यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकजुटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत पोहोचवावीत. येत्या काळात जीवनातील महत्त्वाच्या निर्णयात आमूलाग्र बदल होऊन आणखी चांगल्या प्रकारची व्यवस्था दिसेल. भाजपच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच. ग्रामस्थांचे आशिर्वाद कायम ठेवा. गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील बहुचर्चित वासूद ग्रामपंचायतीवर भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी जयश्री अरुण केदार यांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. विशेष म्हणजे सरपंच पदाच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची मुक्त उधळण करत आनंद साजरा केला.
वासूद ग्रामपंचायतीवर भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. सरपंच कलावती केदार यांनी राजीनामा दिल्यानंतर बुधवारी सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यात भाजपकडून जयश्री अरुण केदार यांनी अर्ज दाखल केला होता .यावेळी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. यात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी जयश्री अरुण केदार यांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. वासूद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक विरोधकांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत जयश्री अरुण केदार यांची सरपंचपदी निवड झाली आहे. यावेळी चेतनसिंह केदार सावंत यांच्या हस्ते नूतन सरपंच जयश्री केदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच अनिल (बंडू) केदार, माजी सरपंच कलावती केदार, सदस्य बबन ऐवळे, अंकुश खटके, विठाबाई चव्हाण, मोहन साळुंखे, विश्वंभर केदार, बापूराव केदार गुरुजी, बाळासाहेब केदार, विष्णुपंत केदार, सौदागर केदार, सेनापती केदार, डॉ.निरंजन केदार, अरुण केदार, सोमनाथ पवार, मधुकर पवार सर, अनिल केदार, नवनाथ केदार, प्रविण केदार, आनंदा केदार सर, दीपक केदार, सोयजित केदार, गणेश केदार, गोपी केदार, गोरख केदार आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!