सांगोला तालुका

गर्भपिशवीच्या आजारांसाठीच्या मोफत  तपासणी आणि उपचाराच्या भव्य शिबिराचे रविवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी आयोजन

डॉक्टर केळकर हॉस्पिटल व माता बालक उत्कर्ष प्रतीष्ठान च्या वतीने सर्व गरजू महिलांना आवाहन

सांगोला(प्रतिनिधी):- नव्याने सुरू झालेल्या अत्याधुनिक डॉक्टर केळकर हॉस्पिटल च्या उद्घाटनप्रसंगी  नामदार श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या घोषणेनुसार सामाजिक बांधिलकीचे भान राखून लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांसाठी गर्भपिशवीच्या आजारांसाठीच्या मोफत  तपासणी आणि मोफत उपचाराच्या भव्य शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 13 नोव्हेंबर  2022 रोजी केले आहे.
डॉक्टर केळकर हॉस्पिटल व माता बालक उत्कर्ष प्रतीष्ठान च्या वतीने सर्व गरजू महिलांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी हॉस्पिटलशी  संपर्क साधावा. या शिबिराच्या अंतर्गत अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी तंत्रज्ञानाने सर्व गरजू महिलांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.याची नाव नोंदणी सोमवार दिनांक 24 ऑक्टोबर 22 पासून डॉक्टर केळकर हॉस्पिटल सांगोला येथे सुरू झाली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!