देश- विदेश

WhatsApp Outage: तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप झालं डाऊन, युजर्सची ट्विटरकडे धाव!

Whatsapp down: जगभरातल्या युजर्सकडून ट्विटरवर यासंदर्भात ट्वीट्स केले जात आहेत.

Whatsapp Down in India: जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. आधी काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. आत्तापर्यंत हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं ट्विटरवर सांगितलं आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सर्व्हरमध्ये बिघाड?

दरम्यान, गेल्या अर्ध्या तासापासून व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडून अद्याप अधिकृत माहिती दिली नसल्यामुळे हा बिघाड नेमका कधीपर्यंत दुरुस्त होईल? याबाबत नेटिझन्स ट्विटरवर विचारणा करू लागले आहे.

दरम्यान, हा बिघाड झाल्यानंतर लागलीच व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याबद्दल ट्विटरवर मीम्स शेअर व्हायला सुरुवात झाली आहे.

 

नेमकं घडलं काय?

दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी युजर्सला अडचणी यायला सुरुवात झाल्याची नोंद डाऊन डिटेक्टरने केली आहे. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन साधारणपणे एक वाजेपर्यंत अडचणी येत असल्याच्या हजारो तक्रारी समोर आल्या. यातील बहुतेक तक्रारी या मेसेज पाठवता येत नसल्याच्या होत्या. तर इतर तक्रारींमध्ये सर्व्हर डिसकनेक्शन आणि मोबाईल अॅप क्रॅश होणे अशा तक्रारींचा समावेश होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!