सांगोला तालुक्यातील १४९ चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिलाचा प्रश्न मार्गी लागला – आ.शहाजीबापू पाटील
सांगोला तालुक्यातील १४९ चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिलासंदर्भात आमदार शहाजीबापू पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान ना.अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व १४९ चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाचवेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाचवेळी सर्वच १४९ चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
२०१८-१९ मधे सांगोला तालुक्यात दुष्काळी भागातील पशुधन जतन करण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. चारा छावणी चालकांचे अनुदान प्रलंबित राहिल्याने चारा छावणी चालक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यानंतर चारा छावणी चालकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन चारा छावणीचे प्रलंबित अनुदान तात्काळ मिळावे यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सांगोला तालुक्यातील १४९ चारा छावणी चालकांच्या प्रलंबित अनुदानासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्याचें मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांची चारा छावणी चालकांचे प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यासंदर्भात चर्चा झाली . यावेळी ना. अनिल पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील सर्वच्या सर्व १४९ चारा छावणी चालकांची प्रलंबित बिले एकाचवेळी तात्काळ देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
छावणी चालकांच्या बिलासंदर्भात पसरलेल्या खोट्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून एकाचवेळी सर्वच १४९ चारा छावणी चालकांची बिले मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या चारा छावणीच्या बिलाचा प्रश्न मार्गी लागल्याने चारा छावणी चालकांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार मानले आहेत.