नाझरा विद्यामंदिर प्रशालामध्ये शिक्षक दिन साजरा
नाझरा(वार्ताहर):- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य बी.एस.माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सूर्यकांत आदाटे,माजी उपसरपंच नागेश रायचुरे,राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दादासो माजी ग्रामपंचायत पांडुरंग वाघमारे,विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी सुशांत ऐवळे, ओंकार देशपांडे आधी उपस्थित होते. सर्वप्रथम कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छापत्र व फुल देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी दादासो हरीहर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत गुरुजनांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.