न्यू इंग्लिश स्कूल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी
सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल सांगोला मध्ये २८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या सुरूवातीला न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी न्यू इंग्लिश स्कूल चे उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक दशरथ जाधव,तात्यासाहेब इमडे,सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम,जेष्ठ शिक्षक माणिकराव देशमुख सर उपस्थित होते.
सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चैतन्य फुले सर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा घेवुन महात्मा फुलेंचे स्त्री शिक्षणातील महत्व आधोरेखित केले.यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.घोगरे मॅडम यांनी सांगितले की,शिक्षणाद्वारे स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे पवित्र कार्य महात्मा फुलेंनी केले.त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत झाले,हे आपले भाग्य आहे. महात्मा फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तत्कालीन स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचा विचार करून स्त्रियांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलींची पहिली शाळा सुरू केली.या कार्यात तत्कालीन समाजकंटकांनी त्यांना अतोनात त्रास दिला. हेटाळणी, दुःख त्यांच्या वाट्याला आले.आजच्या समाजाने, स्त्रियांनी, विद्यार्थीनींनी या त्यागाची, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांची व कार्याची जाणीव ठेवली पाहिजे.त्यांच्या आदर्श विचारांचा नक्कीच अंगीकार केला पाहिजे. माणसे उगीचच मोठी होत नसतात तर त्यांच्या कर्तृत्वामुळे समाज त्यांना शीर्ष स्थान देत असतो असे त्यांनी शेवटी सांगितले.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शिंदे मॅडम यांनी केले तर शेवटी आभार प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर यांनी मानले.