सांगोला तालुकाक्रीडा

पायोनियर स्कूल य. मंगेवाडी मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

खंडोबा बहुउद्देशीय संस्थेच्या पायोनियर इंग्लिश , सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल व पायोनियर निवासी गुरुकुल मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला..या क्रीडा महोत्सवात सांघिक व वैयक्तिक विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले.
प्रत्येक वर्गाचे संघ यामधे सहभागी झाले होते.प्रेक्षकांनी भरभरून या स्पर्धेला दाद दिली.

या स्पर्धेत पायोनियर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले . आज माध्यमिक विभागात कुस्ती ,खो खो , कबड्डी , क्रिकेट , १०० मी. ,२०० मी. आणि ४०० मीटर धावणे , भालाफेक , गोळा फेक, हातोडा फेक , व्हॉलीबॉल , लांब उडी , वॉकिंग , सायकलिंग , ई. स्पर्धा पार पडल्या.प्राथमिक विभागात हॉपिंग , खो खो , कबड्डी , लंगडी , सॅक रेस , सायकलिंग , रानिंग , बुक बॅलंस , लांब उडी , लेमन स्पून , बॉल कलेक्टिंग , फ्रॉग जम्प, ई. क्रीडा प्रकार घेण्यात आले.

या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी खेळ भावना टिकवून , खिलाडू वृत्ती चे दर्शन घडवले. खेळाडूंची प्रामाणिकता व उत्साह पाहून प्रेक्षक वर्ग भारावून गेले. उपस्थित पालकांनी प्राचार्य अनिल येलपले सर यांचे शाळेच्या विद्यार्थ्यांचे खेळातील कौशल्य विकसित केल्याबद्दल कौतुक केले. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व संघाना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. व ८ आणि ९ जानेवारीला होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात विजेत्यांना सर्टिफिकेट व ट्रॉफी देण्यात येणार आहेत.

या क्रीडा महोत्सवातील सर्व सामन्यांचे समालोचन अतिशय खुमासदार व आपल्या ग्रामीण बोलीभाषेत पायोनियर स्कूल चे सांस्कृतिक विभाग प्रमुख आशुतोष रूपनर सर यांनी केले… पंच म्हणून क्रीडा शिक्षक मोहन वाघमारे सर आणि अजित लाडे सर , मा.सरपंच दत्तात्रय मासाळ यांनी काम पाहिले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!