जि.प.बनकरवाडी शाळेत आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन संपन्न
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवाडी येथे नुकतेच मा. गजानन बनकर यांचे आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले. यावेळी या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रेमी एम डी.बनकर सर ,माता पालक कोमल तोरणे. मनिषा बनकर हे ही उपस्थित होते. सुरुवातीला मुख्याध्यापिका राजेश्वरी कोरे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
त्यानंतर गजानन बनकर यांनी विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत आर्थिक साक्षरता याविषयी माहिती दिली. त्यांनी आपल्या जवळील पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे, योग्य परतावा मिळणे, जोखीम स्विकारणे, तसेच लहानपणापासूनच बचतीची सवय असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले सुरक्षित होते. शिक्षण व आरोग्य या गोष्टीसाठी बचत आवश्यक आहे हे ही सांगितले. तसेच कर्ज घेणे व ते वेळेवर फेडणे ही आर्थिक साक्षरतेची महत्त्वाचा टप्पा आहे हे सांगितले. त्यानंतर एम.डीन.बनकर सर यांनी आपण आपल्याला मिळणार्या उत्पन्नाचा काही भाग बचत करणे आवश्यक आहे त्यामूळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण राहते हे सांगितले.त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली.
शेवटी आभार प्रदर्शन अंजली बिराजदार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक जगताप सर व सविता फुले मॅडम यांचे सहकार्य लाभले.