sangola

जुनोनी कोळा परिसरात सालगडी शोधण्यासाठी शेतकऱ्यांची होतेय धावाधाव सुरू.

सालगड्याला लाखोंचा भाव; जादाचे पैसे देऊनही गडी मिळेना

HTML img Tag Simply Easy Learning    
सांगोला तालुक्यातील पश्चिम भागातील कोळा,जुनोनी डोंगर पाचेगाव,किडबिसरी, कराडवाडी,कोंबडवाडी, तिप्पेहळी,गौडवाडी,गुणापवाडी,काळूबाळूवाडी,जुजारपुर हटकर मंगेवाडी, हातीद,गौडवाडी,सोमेवाडी,बुधेहाळ या परिसरात शेतीच्या हंगामाचे नवे वर्ष सुरू होते. त्यामुळे नव्या शेती हंगामासाठी नवा सालगड्यांची शोधमोहीम जोरात सुरू झाली आहे. त्यात सालगड्यांनी विविध पॅकेजची मागणी केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. सव्वा ते दीड लाख रुपयांचे पॅकेज देऊनही सालगडी मिळेना, अशी गंभीर स्थिती शेतकऱ्यांची झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
 ग्रामीण भागातील शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत डाळिंब ज्वारी द्राक्षे मका आंबे इत्यादी पीक लागवडीकडे वळाला आहे. शेतीत कामे करण्यापेक्षा शहराकडे मुंबई पुण्याला सांगली साताराकडे नवीन पिढी धाव घेत असल्याने शेतमालकांना सालगडी मिळणे कठीण झाले आहे. शेतातील ज्वारी निघताच नवीन सालगडी पुढील हंगामात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आपापसांतच स्पर्धा लागली आहे. निसर्गाच्या लहरीपणावर ग्रामीण भागातही खेळला जाणारा शेती जुगार असल्याची भावना नवीन पिढीत निर्माण लहान-मोठे काम करण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे सालगडी व मजुरांचा तुटवडा शेतीच्या कामासाठी निर्माण झाल्याने, शेतमालकांची मोठी कोंडी होत आहे.
शेतमालक या गावावरून त्या गावावर सालगड्याच्या शोधत फिरत आहेत. त्यासाठी कोणी बिहार, मध्य प्रदेशातून कर्नाटकातून कुटुंबासह सालगडी आणत आहेत. शेतकऱ्यांनी काही जणांच्या साल दरात वाढ केली आहे. त्यांना पुढच्या एका वर्षाला सव्वा लाख ने दीड लाख रुपायांपर्यंत साल ठरवले जात असून त्यातही काम करत असताना खाडे न धरण्याची मागणी सालगड्यांनी केली आहे.यंदाच्या वर्षी चंदा सालगड्यांनी सालाच्या पैशाव्यतिरिक्त मोबाइल व त्याच्या रिचार्जचा खर्च, वर्षाला दोन किंटल गहू, दोन किटल ज्वारी, त्यासोबतच शेतात टी. व्ही. पाहण्यासाठी डिश व दुधाची मागणी सालगडी करतात. याशिवाय सालगड्याच्या बायकोला वर्षभर शेतात दररोज तीनशे रुपये हजेरीने काम मिळते त्याचा वेगळा मोबदला शेतकऱ्यांना द्यावा लागतो. वर्षांसाठी काम केले तर काहींनी साल दर कायम करण्यास असमर्थता दाखविल्याने नवा सालगडी शोधण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. हुशार, मेहनती, निर्व्यसनी सालगड्याला सर्वच शेतकऱ्यांतून प्रथम पसंती दिली जात आहे. त्यामुळे असा माणसांचा शोध घेताना शेतकऱ्यांची धावपळ होताना दिसत आहे.
HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!