sangolaeducational

शैक्षणिक प्रवेशा करिता आवश्यक दाखल्यासाठी घेरडी येथे विशेष शिबिर संपन्न 

घेरडी (प्रतिनिधी ): सांगोला तहसील कार्यालयाचे वतीने निराधार तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशा करिता विवीध दाखले आवश्यक असतात. त्यासाठी घेरडी व परिसरातील लाभार्थ्यांसाठी घेरडी ग्रामपंचायत सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर मौजे घेरडी गावचे तलाठी विनोद भंडगे  व घेरडी मंडलच्या मंडल अधिकारी व्ही. बी. भितकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. यावेळी घेरडी मंडळ अंतर्गत पारे ,हंगीरगे , डिकसळ ,नराळे हबिसेवाडी ,वाणीचिंचाळे तसेच वाकी (घेरडी) , आलेगाव या गावचे सर्व तलाठी उपस्थित होते.
या सर्व गावातील निराधारांसाठी उत्पन्नाचे दाखले , विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला, डोमासाईल ,शेतकरी दाखले ,उत्पन्न दाखला , नॉन क्रिमिलियर ,सेंट्रल ओबीसी असे वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देण्यात आले. यावेळी परिसरातील सर्व महा ई सेवा चालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!