*सह्याद्री मध्ये जागतिक योग दिन साजरा*
दिनांक २१ जून २०२४ रोजी आमच्या शाळेत जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी जाधव मॅडम यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि निरोगी जीवनासाठी त्याची गरज यावर प्रकाश टाकला. त्यानंतर योग प्रशिक्षका सौ मंगल पाटील सौ सुजाता दिवटे आणि सौ शितल वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण केले. सर्वांनी एकत्रितपणे सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यानधारणा केली.
कार्यक्रमाच्या शेवटी , संस्थेच्या व्यवस्थापिका अनिता इंगवले यांनीसर्व मार्गदर्शकांचे आभार मानले आणि योगाच्या नियमित सरावाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “योग केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक तंदुरुस्तीसाठीही उपयुक्त आहे.”
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे विशेष योगदान होते. या यशस्वी आयोजनामुळे शाळेतील सर्वांना योगाचा अनुभव घेता आला आणि पुढेही नियमित योगाभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.