sangolasolapur

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अंतर्गत कांदाचाळ अनुदानासाठी अर्ज करावे

– एकात्मिक फलोत्पादन विकाय कार्यक्रम या योजनेसाठी काढणीपश्चात व्यवस्थापण घटकांतर्गत जिल्हयास कांदाचाळ या घटकास अनुदान मंजुर झालेले असुन सदर घटकाची माहिती खालील प्रमाणे
   अर्थसहाय्याचे स्वरुपः-
 5,10,15,20 व 25 मे. टन क्षमतेच्या कांदा चाळी उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल रु.3500 प्रति मे.टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य देय राहील.  7000 रुपये प्रति मे.टन खर्च व 3500 रुपये अनुदान प्रति मे.टन अनुदान
योजनेचा उद्देश :- कांदा पिकाचे साठवणूकीत होणारे नुकसान कमी करणे.  कांदा पिकाची हंगामामध्ये आवक वाढुन कांदयाचे भाव कोसळणे तसेच हंगामाव्यतिरीक्त कांदयाचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणे अशा समस्येवर अंशतः नियंत्रण मिळविणे.
लाभार्थी निवडीचे निकष :- शेतकऱ्याने योजनेअंतर्गत अर्ज करताना त्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. 7/12 वर कादा पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे कांदापिक असणे बंधनकारक आहे. सदर योजनेचा लाभ वैयक्तिक कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, स्वयंसहायता गट, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचे उत्पादक संघ (Farmers Producer Organizations), नोंदणीकृत शेतीसंबंधी संस्था, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, सहकारी पणन संघ यांना घेता येईल.
     तरी जिल्हयातील सर्वसाधारण, अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती व इतर सर्व प्रवर्गातील शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, वरील प्रमाणे घटकासाठी अधिकाधिक शेतक-यांनी महा-डीबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!