इनरव्हील क्लब ऑफ सांगोला ने केला जिल्हा परिषद शाळेचा कायापालट…..

सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारा इनरव्हील क्लब हा प्रामुख्याने महिलांचा क्लब आहे गेली अनेक वर्ष हा क्लब सांगोला तालुक्यामध्ये आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक कार्याने, समाजात स्थान निर्माण करून आहे. याचीच प्रचिती सन 2024- 25 इनर व्हील च्या अध्यक्षा सौ स्वाती अंकलगी यांनी आणून दिली. बुंजकरवस्ती येथील जिल्हा परिषदेची शाळा अतिशय डबघाईला आलेली होती. इनरव्हीलच्या ‘हॅप्पी स्कूल’ कार्यक्रमांतर्गत या बुंजकरवस्तीच्या शाळेला दत्तक घेण्यात आले आणि तेथील शाळेचे रूपच बदलून टाकण्यात आले गेल्या एक वर्षांमध्ये या शाळेमध्ये अनेक मोठे बदल झाले.
सर्वात प्रथम या शाळेच्या भिंतींना बोलकं करण्यात आलं, विविध प्रकारच्या चित्रांनी ही इमारत रंगवून सुंदर बनवली, तसेच परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसावा म्हणून पेविंग ब्लॉक आवारामध्ये बसरण्यात आले तसेच डिजिटल क्लासरूम करण्यात आल्या, पाण्याची टाकी बसवून सॅनिटायझर स्टेशन बसवून स्वच्छतागृह अद्यावत करण्यात आले,अशा पद्धतीने जिल्हा परिषदेच्या शाळेला भौतिक सुविधा पुरवून जवळजवळ दीड लाख रुपये खर्च करून इनरव्हील क्लब ने आपला नावलौकिक करत या शाळेचा कायापालट करून सांगोला शहरवासीयांसाठी एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे दिनांक 15/ 03/ 2025 रोजी इनरव्हील क्लब अध्यक्षा सौ स्वाती अंकलगी यांच्या शुभहस्ते हॅप्पी स्कूल उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच इनरव्हील इंडिया लिटरसी मिशन या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या साठी तन मन धन व तळमळीने काम करून या शाळांना पुनर्जीवित करण्याचं काम करणाऱ्या सौ.राजेश्वरी कोरे मॅडम, सौ शितल भाटेकर, सौ सावित्रा कस्तुरे, सौ स्मिता शिंदे, सौ सारिका गवसणे, सौ वैशाली शेळके, या शिक्षकांचा इनरव्हील क्लब कडून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं.
तसेच वीस वर्षे एकाच शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या सौ, स्वाती नीलकंठ व सौ सुनीता खंकाळ यांनाही प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं.याप्रसंगी जिल्हा परिषद केंद्रप्रमुख इनामदार सर शिरभावीच्या केंद्रप्रमुख पावले मॅडम यांनी इनरव्हील क्लबच्या या उपक्रमा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमासाठी आवर्जून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ व श्री सुधीर बुंजकर आणि इनरव्हील सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे निवेदन शाळेच्या शिक्षिका सौ स्मिता शिंदे तर सारिका गवसणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.