जुनोनी:-जुनोनी गावचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक श्रीमंत व्हनमानेे यांचे गुरुवारी सांगली येथे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 55 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
श्रीमंत व्हनमाने हे टेलर या नावाने परिचित होते. सामाजिक कार्यामध्ये ते नेहमी अग्रेसर राहून हिरीरीने सहभागी होत होते. त्यांच्या निधनाने जुनोनी गावांमध्ये व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा तिसरा दिवस शनिवार दिनांक 15 मार्च 2025 रोजी सकाळी 7.30 बळवंतमळा जुनोनी येथे होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.