सांगोला: सांगोला येथील महिला शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या विद्यमान संचालिका श्रीमती शोभा सुरेश रसाळ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 60 होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
निलेश रसाळ व योगेश रसाळ यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, सुना, जावई, नातंवडे असा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवस शनिवार दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकाने सांगितले.