इनरव्हील क्लबच्यावतीने दिवाळीनिमित्त महिलांना साडी व दिवाळी फराळ वाटप

सांगोला(प्रतिनिधी):-इनरव्हील क्लबने दिवाळीचे औचित्य साधून झोपडपट्टीतील 75 महिलांना साडी व फराळाचे वाटप केले. यावेळी क्लबच्या सदस्यांनी स्वेच्छेने साडी व फराळ देऊ केली. सदरचा उपक्रम हा सांगोला शहरातील राणोजीबुवा बाग ,अंबिका देवी मंदिर समोर घेण्यात आला. यावेळी झोपडपट्टीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुवर्णा इंगोले मॅडम यांनी इनरव्हील विषयी माहिती सांगितली. त्याचबरोबर उमा उंटवाले यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी अध्यक्षा उमा उंटवाले, वर्षा बलाक्षे, योगिनी सोनलकर ,वैशाली बेले, सुनिता राऊत, स्वाती ठोंबरे, मंगल लाटणे ,सविता लाटणे, सुशीला नांगरे, अनिता कमले, शुभांगी पाटील इत्यादी सदस्या उपस्थित होत्या.