sangola

माणूदत एक्सप्रेस, आता नव्या रूपातही…

आज दिवाळीचा पाडवा.सांगोला शहरासह तालुक्यात त्यानिमित्ताने एक उत्साहाचा व आनंदाचा माहोल आहे. दोन वर्षांनी दिवाळी साजरी होतेय.करोना संसर्गामुळे सरकारी नियमांचे बंधन आल्यानंतर ही दिवाळी आपण साजरी करू शकलो नाही. वेळ तीच राहात नाही,असे म्हटले जाते. ते अगदी खरे आहे.कोरोना हद्दपार झाला.निर्बंधही उठले.त्यामुळे सामाजिक स्वातंत्र्य आपल्याला पुन्हा मिळाले. यंदा पाऊस-पाणीही चांगले आहे.त्यामुळे ग्रामीण भाग जाम खूष आहे.यंदा खरेदी-विक्रीची मोठी उलाढाला झाल्याने व्यापारी व उद्योजक  यांच्यात समाधानाचे चित्र दिसत आहे.यानिमित्ताने आम्ही एक आमच्या वाचकांना, जाहिरातदारांना, नेत्यांना व विविध संस्थांना एक आनंदाची बातमी सांगू  इच्छितो. सांगोला शहर आणि तालुक्यासह आसपासच्या भागात पत्रकारितेच्या क्षेत्रात एक मापदंड ठरलेल्या  माणदूत एक्सप्रेस या दैनिकाची गाडी आता नव्या रूपात धावू लागणार आहे.या दैनिकाबरोबरच आता माणदूत एक्सप्रेसची न्यूज वेबसाईट आम्ही तयार केली असून त्याचा शुभारंभ पाडव्याच्या शुभमुहुर्तावर करत आहोत. त्यामुळे शहर व तालुक्यात तसेच जगातील प्रसंग तत्काळ आमच्या वाचकांना पहायला मिळणार आहे.

सांगोला शहर व तालुक्यातील बहुसंख्य मंडळी व्यापार व नौकरीच्या निमित्ताने बाहेर असतात.सांगोल्याची डाळिंब व इतर फळे सातासमुद्रापार गेल्यामुळे सांगोलेकर जगाच्या पाठीवरही सापडतील.ते कुठेही असले तरी सांगाल्याविषयी त्यांना आपुलकी असते.आपल्या भागात काय घडते,याची उत्सुकताही त्यांना असते.सांगोल्याचे दर्शन वेबसाईटमधून घडवण्याची मागणी आमच्याकडे सातत्याने केली गेली. त्याचा विचार करून माणदूत एक्सप्रेस डॉट कॉम ही वेबसाईट आम्ही तयार केली आहे.त्यासाठी माणदूत एक्सप्रेसमधील सारी टीम त्यासाठी कार्यरत असणार आहे. त्यामुळे सांगोलेकरांबरोबरच सांगोल्याच्या बाहेर असणार्‍यांना घडामोडींचे दर्शन घडणार आहे.आज जग अत्यंत फास्ट झाले आहे.नोकरी असेल वा शिक्षण.सतत पळणे हे कर्तव्य ठरत आहे. त्यामुळे घडामोडी देखील वेगाने घडतायेत.त्याची माहिती उद्या कळण्याऐवजी त्याच क्षणी कळवण्याची सोय या वेबसाईटमधून होणार आहे.  यूट्यूब ही गूगलची महाजालावरती चलचित्र पाहण्यासाठी व दाखवण्यासाठीची सुविधा आहे. जरी काही व्यावसायिक संस्था यूट्यूबच्या भागीदारीने आपल्या कार्यक्रमांच्या थोड्याफार चित्रफिती येथे चढवत असल्या तरी, मुख्यतः येथील बहुतेक सामग्री ही वैयक्तिक खातेधारकांनीच चढवलेली आहे. ही सुविधा गूगलच्या नोंदणीकृत खातेधारकास विनामूल्य मिळते. यात कोणतीही व्यक्ती चित्रफिती टाकू शकते. यूट्यूब वापरकर्त्यांना अपलोड, दृश्यमान, रेट, सामायिक, आवडीमध्ये जोडण्यासाठी, अहवाल देण्यासाठी, व्हिडिओवर टिप्पणी देण्यासाठी आणि इतर वापरकर्त्यांसाठी सदस्यता घेण्यासाठी अनुमती देते. हे वापरकर्त्याद्वारे उत्पन्न आणि कॉर्पोरेट मीडिया व्हिडिओंची विस्तृत विविधता प्रदान करते. उपलब्ध सामग्रीमध्ये व्हिडिओ क्लिप, टीव्ही शो क्लिप, संगीत व्हिडिओ, लघु आणि डॉक्यूमेंटरी चित्रपट, ऑडिओ रेकॉर्डिंग, चित्रपट ट्रेलर, थेट प्रवाह आणि व्हिडिओ ब्लॉगिंग, लघु मूळ व्हिडिओ आणि शैक्षणिक व्हिडिओ यासारख्या इतर सामग्रीचा समावेश आहे.ई पेपर अर्थात वर्तमान पत्रांचाही आहे.आज घरी बसल्या मोबाईलवर वर्तमान पत्रे दिसू लागतात तसेच जगातील व आपल्या भोवतालच्या घडामोडी पहायला मिळू शकतात.काळ बदलत चालला आहे.माहिती-तंत्रज्ञानाकडून मोठी झेप घेतली गेली आहे.काळानुसार आपल्याला बदल स्वीकारलाच पाहिजे. तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे पण आपल्या परिसरापासून आपण दूर जात आहोत,अशी एक ओरड सातत्याने होत होती परंतु युट्यूब व वेबसाईटमुळे आपला परिसरही आता जवळ आला आहे. हा बदल ओळखून पावले टाकण्याची गरज आहे. कारण आज प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला आहे. त्याला प्रिंट मीडिया कसा अपवाद असू शकेल. आम्ही मोठ्या धाडसाने या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

गेल्या वीस वर्षात सांगोलेकरांनी माणदूत एक्सप्रेसवर जे प्रेम दाखवले,तेच प्रेम नव्या संकल्पनेला मिळावे,अशी अपेक्षा आम्ही यानिमित्ताने व्यक्त करत आहोत.सांगोलेकरांच्या पाठबळावरच हा संकल्प सिद्धीस जाणार आहे,हे मात्र नक्की .दीपावली पाडव्यानिमित्त आमचे वाचक, जाहिरातदार, संस्था, व्यापारी, उद्योजक या सार्‍यांना माणदूत एक्सप्रेस परिवाराच्या वतीने शुभेच्छा.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!