महाराष्ट्र
डॉ अनिकेत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ऋषिकेश मेटकरी यांचेकडून शालेय विदयार्थ्यांना खाऊ वाटप

सांगोला :-शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रिय नेते डॉ अनिकेत भैय्या देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ऋषिकेश भैय्या मेटकरी यांचेकडून मुक बधिर निवासी शाळा सांगोला येथील विदयार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
३ ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्याचे युवा नेते शेतकरी कामगार पक्षाची तोफ व सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांनी वाढदिवसनिमित्त अनावश्यक खर्च न करता परग्रस्त नागरिकांना मदतीचे आवाहन त्यांनी केले होते .
त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विशेषतः देशमूख कुटूंबियावर प्रेम करणाऱ्या सर्वानी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू गव्हु, तांदूळ, ज्वारी इत्यादी साहित्य जमा केलं असून ते साहित्य प्रशासकीय यंत्रणेमार्फत पुरग्रस्थांना वाटप करण्यात येणार आहे.
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून मुक बधिर निवासी शाळा सांगोला येथे खाऊ वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासून ऋषिकेश मेटकरी यांनी एक आदर्श सर्वांपुढे ठेवला त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



