सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला येथे डॉ. बोराडे हॉस्पिटलचा आम. डॉ. बाबासाहेब देशमुख व माजी आम. दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सांगोला -कडलास रोड येथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला. डॉ.बोराडे हॉस्पिटलमध्ये मेडिसिन व स्त्रीरोग असे दोन विभाग कार्यान्वित होत आहेत. डॉ. प्रमोद बोराडे हे मेडिसिन विभागातील रुग्णसेवा देणार असून डॉ. प्राजक्ता बोराडे या स्त्रीरोगतज्ञ असून स्त्रियांसंबंधीचे आजार याविषयी ते वैद्यकीय सेवा देणार आहेत.
लवकरच डॉ. बोराडे हॉस्पिटलमध्ये शासनाच्या मोफत आरोग्य उपचाराच्या योजना कार्यान्वित होणार असल्याचे डॉ. प्रमोद बोराडे यांनी सांगितले आहे. डॉ. बोराडे हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारावर उपचार केले जाणार आहेत. डॉ. प्रमोद बोराडे यांनी 2019 साली महात्मा फुले चौक येथे डायग्नोस्टिक विभाग सुरू करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुरावजी गायकवाड, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. पी.सी. झपके, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख, सीए के.एस माळी,सांगोला अर्बन बँकेचे संचालक सुरेश आप्पा माळी, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, माजी नगरसेवक ॲड. भारत बनकर, सांगोला अर्बन बँकेचे संचालक गोविंद माळी, स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे अध्यक्ष पी.बी रोंगे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत, पत्रकार अशोक बनसोडे, शिवसेना शहराध्यक्ष कमरुद्दीन खतीब, रेवनील ब्लड बँकेचे अध्यक्ष सोमेश्वर यावलकर, माजी जि. प. सदस्य अतुल पवार, समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नवनाथभाऊ पवार, यांच्यासह आदी मान्यवर ,विविध संस्थांचे पदाधिकारी, मित्रपरिवार, नामवंत डॉक्टर यांची या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती होती. धर्मराज बोराडे व डॉ. प्रमोद बोराडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.