मातालक्ष्मीच्या पालखीचे महादेव गल्ली येथे जोरदार स्वागत; महादेव गल्लीतील महिलांच्या लेझीम नृत्याने जिंकली उपस्थितांची मने

वाढेगांव – वाढेगांव ता. सांगोला येथे दसऱ्यादिवशी मातालक्ष्मीच्या पालखीचे महादेव गल्लीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. दरवर्षी या पालखीची मोठ्या उत्साहात वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. यामध्ये गावातील सर्वच भाविकभक्त मोठ्या श्रध्देने सामील होतात. ही पालखी महादेव गल्ली येथे आली असता नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.
पालखीच्या स्वागतासाठी महादेव गल्ली येथील महिलांनी सादर केलेल्या लेझीम नृत्य, टिपरीनृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुंदर व बहारदार अशा कार्यक्रमांनी पालखी सोहळा उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
——————————
नवरात्र म्हणजे स्त्रीत्वाचा उत्सव, सृजनाचा उत्सव. नवरात्रीचा मुख्य भाग म्हणजे विश्वातील स्त्रीत्वाचा सन्मान करणे. या भावनेतूनच नवरात्र महोत्सव मंडळ, महादेव गल्ली यांनी यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना प्राधान्य दिले. स्त्रीयांनी स्वतः ला कमकुवत न समजता अशाप्रकारच्या उत्सवातून पुढे याव. या माध्यमातून आम्हीही कुठे मागे नाही हे सांगण्याचा प्रयत्न महादेव गल्ली येथील नवरात्र महोत्सव मंडळाने केला. यापुढे अशा उत्सवातून सर्वच मंडळानी सांस्कृतिक कार्यक्रमांतून पुरूषांबरोबर महिलांनाही प्राधान्य द्यावे हा संदेश दिला. सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होताना दिसत आहे.
——————————



