सांगोला प्रतिनिधी —- दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त सांगोला रोटरी क्लबच्या वतीने विशेष स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले. हे अभियान महात्मा फुले चौक, एसटी स्टँड आवार, वासुद चौक आणि रेल्वे ब्रिज बोगदा या प्रमुख ठिकाणी घेण्यात आले.
अभियानाची सुरुवात संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या फोटो प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यामुळे उपस्थित सदस्य व नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि अभियानाची गाज तयार झाली.
अभियानात रोटरी क्लबचे रोटेरियन सदस्य सक्रिय सहभागी होते. यामध्ये डॉक्टर प्रभाकर माळी, डॉक्टर अनिल कांबळे, इंजिनीयर मधुकर कांबळे, सी ए के एस माळी, इंजिनिअर हमीद शेख, डॉक्टर संतोष पिसे, विजय म्हेत्रे, इंजिनिअर विलास बिले, इंजिनिअर विकास देशपांडे, इंजिनियर अशोक गोडसे, सुरेश माळी, गोविंद माळी, सौ मंगल चौगुले, सौ प्रतिमा माळी, अरविंद डोंबे गुरुजी उपस्थित होते
स्वच्छता मोहिमेद्वारे परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेची व पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. उपस्थित सदस्यांनी रस्ते, चौक, आवार व पुलांची स्वच्छता करून हातभार लावला.
रोटरी क्लबचे उपक्रम नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचविण्यासाठी व परिसर सुशोभित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत. या मोहिमेमुळे सांगोल्यात स्वच्छतेची नवचैतन्य निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.