जुनोनी अपघातस्थळी आठवण म्हणून तिप्पेहाळी ग्रामस्थांनी लावला वारकरी झेंडा
जय हनुमान भजनी मंडळाने केले आदर्शवत काम
सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे जठारवाडी जिल्हा कोल्हापूर येथील वारकरी मंडळी कार्तिकी वारी साठी दिंडी सोहळा घेऊन विठुरायाच्या भेटीला श्रीक्षेत्र पंढरपूरला पायी निघाले होते त्या दिंडी सोहळ्यामध्ये जुनोनी गावच्या हद्दीत अचानक काळानं घाला घातला आणि त्या दिंडीमध्ये पाठीमागून एक कार शिरली आणि दिंडीमधील ७ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला तरी त्यांना परत वारकऱ्यांच्या घरी जन्म देऊन परत त्यांच्या दिंडी सोहळा चालू राहावा आणि विठुरायाचे दर्शन घडावे म्हणून देहूकर सांप्रदायिक भजनी मंडळ तिप्पेहळी यांच्या वतीने ज्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी जाऊन एक वारकरी झेंडा बांधला गेला व अभंग म्हणून आरती केली.
आदर्शवत काम जय हनुमान भजनी मंडळाने केले .सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यामध्ये वारकरी मंडळ यावेळी हरिभक्त परायण बाबुराव नरळे महाराज , मा सरपंच अरुण बजबळकर, किरण भाऊ पांढरे, पत्रकार जगदीश भाऊ कुलकर्णी , अंकुश महाराज बजबळकर, उमेश महाराज नरळे, संजय महाराज माने, आप्पा महाराज नरळे , सचिन महाराज नरळे, पैलवान आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.