विज्ञान महाविद्यालयात कबड्डी सराव शिबिर संपन्न
अमरावती येथे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिलांच्या कबड्डी स्पर्धा
विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर महिला कबड्डी संघाचे दिनांक 29 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान सात दिवसाचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
या प्रशिक्षण शिबिरांमधील महिला खेळाडूंना ज्येष्ठ शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय पवार यांचे मार्गदर्शन लाभले. दिनांक ७ नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिलांच्या कबड्डी स्पर्धा होणार आहेत
शिबिरार्थी खेळाडूंना निरोप देत असताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉक्टर रघुनाथ फुले यांनी खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. सदरच्या संघा बरोबर संघ मार्गदर्शक म्हणून प्रा.विजय पवार जाणार आहेत.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महिला संघातील खेळाडू पुढील प्रमाणे:- सायली धुला सरक व भाग्यश्री रामचंद्र मरगर ( विज्ञान महाविद्यालय सांगोला ), माळी प्रतीक्षा परशुराम व वायदंडे गायत्री राजहंस ( एल बी पी महिला कॉलेज सोलापूर ), दीक्षा दीपक ( संगमेश्वर कॉलेज सोलापूर ), राऊत कोमल तानाजी (शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज ), गायकवाड काजल विजय ( नातेपुते ), केचे नम्रता तुकाराम (ग्रिन फिंगर कॉलेज अकलूज), पडवले तनिशा गोकुळ (यशवंतराव चव्हाण कॉलेज करमाळा), शिंदे वैष्णवी शिवाजी (बाबूराव पाटील कॉलेज अनगर), शिंदे ऐश्वर्या संतोष (सांगोला)