सांगोला तालुका
सांगोला येथील आकाश चौगुले यांची कतार ‘फिफा वर्ल्ड कप’ ला मॅनेजमेंट पदासाठी निवड
सांगोला (वार्ताहर):. सांगोला येथील पत्रकार उत्तम चौगुले यांचे सुपुत्र आकाश चौगुले यांची कतार देशामध्ये होणाऱ्या फुटबॉल फिफा वर्ल्ड कप 2022 साठी मॅनेजमेंट पदावर प्लॅनेट फूड या कंपनी कडून मॅनेजमेंट पदासाठी निवड करण्यात आली आहे. आकाश चौगुले आज कतार देशासाठी रवाना झाले .
आकाश चौगुले यांचे पहिली ते दहावीपर्यंत सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला येथे शिक्षण झाले त्यानंतर अकरावी आणि बारावी न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे शिक्षण घेतल्यानंतर पुढे पुणे येथे हॉटेल मॅनेजमेंट यु इ आय कोईमत्तूर हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज पुणे येथे मॅनेजमेंटची डिग्री प्राप्त झाल्यानंतर या पदासाठी त्याची निवड झाली आहे. सांगोला शहरातील सर्व मित्र परिवारा मार्फत त्याचे अभिनंदन होत आहे