महूद:समस्त हिंदू बांधवांच्या वतीने श्री दुर्गामाता दौड

महूद, ता. ३ : विजयादशमीच्या निमित्ताने येथील समस्त हिंदू बांधवांच्या वतीने श्री दुर्गामाता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथील श्री दुर्गामाता दौड उपक्रमामध्ये परिसरातील हिंदू तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
येथील श्री दुर्गामाता दौड ची सुरुवात ग्रामदैवत खंडोबा मंदिराच्या ठिकाणी मोहन जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी उपस्थित तरुणांनी दुर्गामाता की जय,वंदे मातरम्,भारत माता की जय,छत्रपती शिवाजी महाराज की जय,धर्मवीर संभाजी महाराज की जय,हर हर महादेव,जय भवानी जय शिवाजी असा घोषणा देत ही दौड येथील मुख्य चौक, मारुती मंदिर, गणपती मंदिर,महादेव मंदिर,छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावरून नेण्यात आली.या दौडमध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी मंदिरामध्ये जाऊन देवदर्शन घेतले. मुख्य रस्त्यावरून जात असताना या दौडमध्ये उभारण्यात आलेल्या भगव्या ध्वजाची पूजा जागोजागी करण्यात आली. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी एकत्र येऊन यावरती पुष्पवृष्टी केली.
दौडची सांगता येथील अंबिका मंदिराच्या प्रांगणात करण्यात आली. यावेळी किरण चव्हाण,अभिषेक कांबळे,महेंद्र खांडेकर,संतोष येडगे, मोहन जाधव यांनी विचार व्यक्त केले.यावेळी नारायण खांडेकर,राजेंद्र खांडेकर,भारत यलमर,अर्जुन घाडगे, संदीप यलमार, प्रवीण नष्टे, हिमालय देशपांडे यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



