india world
मल्लिकार्जून खरगेंनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार
अडीच दशकानंतर गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खासदार शशी थरूर यांचा पराभव केला होता. त्यामुळे सुमारे अडीच दशकानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, आज त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. पक्षाला एकजूट ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान खरगे यांच्या पुढे असणार आहे.