मायाक्का देवी महिला क्रेडीट सोसायटीच्या वतीने सभासदांना व ग्राहकांना दीपावली निमित्त स्वीट वस्तूंची भेट
मायाक्का देवी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असणारे श्रीनिवास करे यांची कमी वयात उत्तुंग भरारी
घेरडी (शशिकांत कोळी):- घेरडीच्या तरुण युवकांच्या मनात स्थान निर्माण करणारे मायाक्कादेवी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्रीनिवास करे यांनी दुध व्यवसाय व मायाक्का देवी महिला क्रेडीट सोसायटीच्या माध्यमातून तरुणांना हाताला काम देण्याचे काम करत आहे त्यामुळे घेरडी परिसरातील तरुण वर्ग त्याच्या कडे आकर्षला जाऊ लागला आहे. एवढेच नव्हे तर क्रेडीट सोसायटीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देऊन उद्योग व्यवसाय उभारण्यात मदत करीत आहेत.
शेतकर्यांना दूध व्यवसायाचा माध्यमातून गायीचे पण वाटप करत आहेत. एवढेच नव्हे तर तरुणांना व्यवसाय करण्यास मार्गदर्शन व मदत करीत आहेत त्याच्या याच वृत्तीमुळे ते सदया घेरडी चे ग्रामपंचयत सदस्य आहेत.तसेच त्यांनी गावामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर ,किराणा मालाचे किट, व वृक्ष वाटप असे अनेक उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात त्यांनी मास्क वाटप केलेत. आता दिवाळी निमित्त त्यांच्या सभासदांना व ग्राहकांना गोड करण्यासाठी घरोघरी जाऊन व महिला क्रेडीट सोसायटी मध्ये दूध व्यवसाय करणार्या त्यांच्या ग्राहकांना देखील स्वीट वाटप केले आणि आणखी भविष्यात तरूणांना जास्तीत उद्योग व्यवसाय करून देऊ, असा मानस असल्याचे ही सांगितले .
यावेळी मायाक्का उदयोग समूहाचे सवेर्र्सर्वा व ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास करे, तंटामुक्त समिती अध्यक्ष फारुख आत्तार, ग्रामपंचायत सदस्य अविनाश जगधने, कृष्णा बुरुंगले, बिरुदेव करे, तोफिक तांबोळी, विनायक स्वामी, ज्ञानेश्वर खांडेकर, प्रभुलिंग स्वामी, बंदेनवाज खलिफा, लक्ष्मण कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.