सांगोला-मिरज रस्त्यावरील रेल्वे भुयारी मार्ग तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावा- डॉ.बाबासाहेब देशमुख
सांगोला येथील रेल्वे भुयारी मार्ग बनला मृत्यूचा सापळा
कोळा(वार्ताहर):-सांगोला मिरज हायवे वरील रेल्वे भुयारी मार्गाने नागरिक प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.सध्या कार्तिकी वारी चालू असल्याने महाराष्ट्रातील रत्नागिरी, सांगली,कोल्हापूर कर्नाटकातील गोव्यासह तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिक तरुण युवक कॉलेजची विद्यार्थी महिला वर्ग बांधव या मार्गाने प्रवास करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.याचा प्रत्यय त्या मार्गाने ये-जा करणार्या सर्व नागरिकांनी अनुभवला आहे.त्याचे कारण असे की फेब्रुवारी महिन्यामध्ये ठेकेदाराने रेल्वे भुयारी मार्गाचे काम हाती घेतले.काम ठेकेदाराने वेळेत पूर्ण केले तर नाहीच.शिवाय अतिशय निकृष्ट प्रतीचे काम केले आहे. मोठा पाण्याचा प्रवाह सतत चालू आहे. हे निदर्शनास येते आहे.सांगोला तालुक्यातून नागपूर-रत्नागिरी हा मोठा महामार्ग असून सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात नागरिक शहरातूनच प्रवास करतात. तसेच हा जो भुयारी मार्ग आहे तो सांगोला तालुक्याच्या महत्त्वाच्या ठिकाणी असल्यामुळे वर्दळ जास्त आहे.सद्यस्थितीला जर विचार केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट येऊ लागले आहेत. विशेषतः भुयारी मार्गाच्या रेल्वे लाईन वरून सुद्धा पावसाचे पाणी टिपटिप पडते आहे.मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत.पाण्याच्या प्रवाहामुळे भुयारी मार्गाच्या खालील खड्डे अक्षरश: निदर्शनास येत नसल्यामुळे अनेक नागरिकांना अक्षरशः पाण्यामध्ये टू व्हीलर गाड्या घेऊन पडावे लागले.
जर रेल्वे प्रशासनाने वेळेत दुरुस्ती केली नाही तर निश्चितपणाने येणार्या काळामध्ये मोठी दुर्घटना टाळण्यासाठी हा भुयारी मार्ग व्यवस्थित कायमस्वरूपी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. विशेषतः सांगोला तालुक्यातील नागरिकांचे प्रवास करताना होणारे हाल तो तात्काळ थांबवावा अन्यथा पुरोगामी युवक संघटना सांगोला येथील रेल्वे भुयारी मार्ग येथे तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारेल असा थेट इशारा पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी आवाहन केले आहे.