चोपडी येथे संत नामदेव महाराज मंदिराच्या सभामंडप बांधकामाचे उद्घाटन

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील चोपडी येथे असणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरासमोर सभामंडपाचे बांधकाम जिल्हा परिषद सदस्य दादासो बाबर यांच्या फंडातून मंजुरी होऊन आले असून या सभामंडपाच्या बांधकामाचे उद्घाटन काल चोपडी येथे करण्यात आले.

शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषद सदस्य दादासो बाबर, माजी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर बाबर, दत्तात्रय खळगे, माजी सरपंच जालिंदर बाबर, रामचंद्र केंगार जनार्दन बाबर, अमोल बाबर,संभाजी पवार, मधुकर बिले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड झाल्याबद्दल चोपडी ग्रामस्थ व शिंपी समाजाच्या वतीने दत्तात्रय डोंगरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच चोपडी परिसरात असणाऱ्या ग्रामस्थांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध असु असा विश्वास दिला.
जि प सदस्य दादासो बाबर व रमाकांत डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास चोपडी परिसरातील सर्व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,चोपडी ग्रामस्थ व सर्व शिंपी समाज उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार ज्ञानेश डोंगरे यांनी.
Nice news
Thanks