सूर्योदय उद्योग समूहाचे वित्तीय क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल
एल.के.पी मल्टीस्टेटमुळे मंगळवेढ्याच्या विकासात मोलाची भर -आ.समाधानदादा अवताडे.

सांगोला(प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सूर्योदय उद्योग समूहात दाखल झालेले एलकेपी मल्टीस्टेट को ओप.सोसायटी या संस्थेची मंगळवेढ्यात शाखा निर्माण झाल्यामुळे या तालुक्याच्या विकासात मोलाची भर पडली असल्याचे गौरवोद्गार आमदार समाधानदादा अवताडे यांनी काढले.
मंगळवेढा शहरातील सरकार चौकात दादासाहेब नागणे शॉपिंग सेंटर या ठिकाणी एल.के.पी मल्टीस्टेटचा लोकार्पण सोहळा काल 24 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष स्थानावरून आमदार समाधानदादा अवताडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगिरतदादा भालके, सागर पाटील ,धनश्री परिवाराचे प्रा.शिवाजीराव काळुंगे, भैरवनाथ शुगरचे अनिल दादा सावंत, जकराया शुगरचे सचिन जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भगीरथदादा भालके म्हणाले की अनिल भाऊ इंगवले यांचे वित्तीय क्षेत्रामध्ये मोठे योगदान असून शेतकरी ,व्यापारी वर्ग व उद्योजक यांच्यासाठी ही संस्था नक्कीच वरदान ठरेल. प्रा.काळुंगे सर यांनीही मंगळवेढेकरांची आर्थिक शिस्त कौतुकास्पद असल्याचे सांगत सुर्योदय परिवारासह या संस्थेलाही शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकांमधून चेअरमन अनिल भाऊ इंगवले यांनी आजवरच्या वाटचालीची पार्श्वभूमी सांगत संस्थेच्या वाटचालीविषयी आपली भूमिका विषद केली. शेवटी आभार संस्थेचे संचालक जगन्नाथ भगत गुरुजी यांनी मांनले. मंगळवेढा शहराच्या मध्यवर्ती भागात, प्रशस्त इमारत व सुसज्ज फर्निचर आणि अनुभवी संचालक व कर्मचारी वर्ग यामुळे ही शाखा लवकरच नावरूपास येणार असल्याच्या भावना देखील यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.

यावेळी तानाजी भाऊ खरात, तानाजी काकडे, बसवराज पाटील, शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर, निलाबाई आटकळे, महादेव बिराजदार गुरुजी, आकाश पुजारी, भारत दादा नागणे, अजित जगताप, प्रदीप शेठ खांडेकर, संजय चेलेकर ,सुजित बापू कदम, प्रा. विनायक कल्लू बरमे उपस्थित होते.
चौकट:- सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून अनिलभाऊ इंगवले यांनी गेल्या 12 वर्षापासून अथक परिश्रम घेतले असून जगन्नाथ भगत, बंडोपंत लवटे, सुभाष दिघे यांना सोबत घेऊन आर्थिक व उद्योग क्षेत्रामध्ये खूप मोठी भरारी घेतली आहे. या उद्योग समूहात दाखल झालेल्या एल.के.पी.मल्टीस्टेटच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवेढा तालुका व परिसरामधून विविध पक्षांचे नेते मंडळी, आजी-माजी पदाधिकारी , व्यापारी बांधव ,विविध संस्थांचे प्रमुख ,महिला भगिनी तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.