*बुंजकरवस्ती सांगोला शाळेसाठी इनरव्हील क्लबकडून दीड लाखांची मदत*

सांगोला ( प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुंजकरवस्ती येथे हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट अंतर्गत शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती स्मिता शिंदे/गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांच्या वतीने तब्बल दीड लाख रुपयांची भरीव मदत मिळाली. या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या मदतीतून शाळेच्या अंगणात पेविंग ब्लॉक बसविणे, भिंतींना आकर्षक रंगरंगोटी व बोलक्या भिंती तयार करणे, पाण्याची टाकी व नळाची सुविधा उपलब्ध करणे, डिजिटल वर्ग खोल्या आणि माहितीपर बोलक्या पताका लावणे असे भरीव कार्य करण्यात आले. या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक आणि प्रेरणादायी शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास शाळेच्या शिक्षिका स्मिता शिंदे/गायकवाड, शिक्षिका सारिका गवसने, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आणि अध्यक्ष सौ. स्वाती अंकलगी उपस्थित होत्या. तसेच इनरव्हील क्लबच्या माधुरी गुळमिरे, प्रतिमा माळी, अरुणा घोंगडे, स्वाती ठोंबरे, संगीता चौगुले, अनिता कमले, विजया बनसोडे, सीमा कुलकर्णी आदी सदस्यांनी हजेरी लावली.भरघोस मदतीबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी सौ. स्वाती अंकलगी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शाळेचे रूप बदलले असे सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख मा.अस्लम इनामदार, शिरभावी केंद्राच्या केंद्रप्रमुख पावले मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अंजली बुंजकर, श्री. सुधीर बुंजकर तसेच इतर मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी इनरव्हील क्लबच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये शितल भाटेकर, स्मिता शिंदे/गायकवाड, राजश्री कोरे, सावित्रा कस्तुरे, सुनीता खंकाळ, स्वाती नीलकंठ, शेळके मॅडम, सारिका या शिक्षकांना गौरविण्यात आले.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल पंचायत गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, विस्तार अधिकारी कुमठेकर व भंडारी साहेब आणि वाढेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मठपती साहेब यांनी विशेष कौतुक करत इनरव्हील क्लब ऑफ सांगोला,अध्यक्षा सौ. स्वाती अंकलगी व सर्व सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि सर्व मान्यवरांना मनःपूर्वक धन्यवाद दिले..