सांगोला (प्रतिनिधी):-वाढेगाव ता. सांगोला येथील सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक सुभाष बजरंग दिघे यांचे सोमवार दिनांक 17 मार्च रोजी दुपारी चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूप्रसंगी त्यांचे वय वर्ष 65 होते.
पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष वसंत दिघे, डॉक्टर मधुकर व मेजर परमेश्वर दिघे यांचे ते बंधू तर डॉक्टर प्रशांत व इंजिनिअर प्रवीण यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुनानाथवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी कार्यक्रम बुधवारी 19 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता वाडेगाव येथे होईल असे नातेवाईकांनी सांगितले.