महाराष्ट्र
*मोरया अर्बन पतसंस्थेचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न*
सांगोला : आर्थिक सबलीकरण व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या सहकार क्षेत्रात आणखी एका विश्वासार्ह संस्थेची भर पडली आहे. आज सांगोला येथे मोरया अर्बन पतसंस्थेच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
या उद्घाटन समारंभासाठी माजी आमदार श्री.दिपक आबा साळुंखे – पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.विनायक साळुंखे प्रशासकीय अधिकरी नगरपरिषद चाकण (पुणे) तसेच माणगंगा अर्बन चे चेअरमन मा. श्री. नितीन इंगोले साहेब यांनी उपस्थिती लावली. तसेच, संस्था अध्यक्ष श्री मोहन कुमार लिगाडे व चेअरमन श्री. ज्ञानेश्वर (माउली) गायकवाड, व्हा. चेअरमन श्री. संदीप इंगवले,सचिव श्री.धनाजी नष्टे व इतर पदाधिकारी, मान्यवर आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा. श्री. नितीन इंगोले साहेब यांनी आपल्या भाषणात पतसंस्थेच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “ मोरया अर्बन ही पतसंस्था आर्थिक प्रगतीला हातभार लावणारी असून, लघु व मध्यम उद्योजक, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना सक्षम आर्थिक सेवा उपलब्ध करून देणार आहे.”मा.श्री. अरुण केदार यांनी सांगितले की, “ही मोरया अर्बन पतसंस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता, समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करेल.
यावेळी श्री. कैलास गोरे , यांनी मोरया अर्बन पतसंस्थे च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
संस्थेचे अध्यक्ष श्री मोहन कुमार लिगाडे यांनी सर्व सभासद व हितचिंतकांचे आभार मानत सांगितले की, “संस्थेच्या माध्यमातून पारदर्शक व परिणामकारक बँकिंग सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. ग्राहकांच्या विश्वासावर ही संस्था पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” या समारंभात पतसंस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी पतसंस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.