जवळा वार्ताहर. मौजे जवळा येथील ग्रामपंचायतची रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 ची तहकूब ग्रामसभा मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी श्री नारायण मंदिरामध्ये उत्साहात संपन्न झाली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.सुषमाताई संभाजी घुले होत्या.ग्रामसभेला ग्रामपंचायत अधिकारी श्री दत्तात्रय रसाळ यांनी मार्गदर्शन केले. सभेमध्ये आमचा गाव आमचा विकास,माझी वसुंधरा, रोजगार हमी योजना, प्लास्टिक बंदी,गावात चालू असलेल्या विकास कामे इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा झाली
सदर सभेसाठी तंटामुक्ती अध्यक्ष श्री.अरुण भाऊ घुले, उपसरपंच श्री.नवाज खलिफा, माजी उपसरपंच श्री.बाबासाहेब इमडे, श्री.प्रमोद साळुंखे,श्री.अनिल सुतार,ग्रामपंचायत सदस्य श्री. विठ्ठल गयाळी,श्री.विजयकुमार तारळकर,श्री.बंडू साळुंखे,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी ग्रामसभेचे आभार ग्रामपंचायत सदस्य सज्जन मागाडे यांनी मानले.