दि. 1 फेब्रुवारी रोजी अंबिकादेवी यात्रेत माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेच्या खाऊ स्टॉलचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.निलिमा कुलकर्णी यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. या वेळी संस्थेच्या सचिव सौ. वसुंधरा कुलकर्णी तसेच संस्था CEO, कार्यालय प्रमुख, संस्था कर्मचारी उपस्थित होते,सन 1982 पासून माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ही संस्था दरवर्षी सांगोल्याच्या अंबिकादेवी यात्रेत संस्थेच्या बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या पदार्थांचा स्टॉल लावत आहे.
दरवर्षी प्रमाणे दरवर्षीप्रमाणे अंबिका देवी यात्रेमध्ये माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित बचत गटातील महिलांनी खाद्य पदार्थ स्टॉल लावले आहेत. यामध्ये कोबी मंच्युरियन, कच्ची दाबेली , पाणीपूरी, पावभाजी , डोसा,भेळ , पिठलं भाकरी ,दही थालीपीठ , वडा पाव , कांदा भजी इ पदार्थ ताजे व खमंग मिळतात.या स्टॉलला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा स्टॉल सोमवार दि १० फेब्रुवारी पर्यंत सुरू ठेवणेत येणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा .