महाराष्ट्र
शिवणे येथे कै. नानासाहेब जानकर यांची पुण्यतिथी साजरी
शिवणे (वार्ताहर)- शिवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवणे येथे कै. नानासाहेब (अण्णा) जानकर यांची 19 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम कै.नानासाहेब जानकर आण्णा च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी कुमारी. माहेश्वरी मेटकरी हिने आण्णा च्या जीवनातील काही प्रसंग सांगितले तर प्रा. राजाभाऊ कोळवले यांनी आण्णाच्या कार्याविषयी माहिती दिली.
यावेळी बोलताना प्राचार्य विजयकुमार वाघमोडे म्हणाले की, आण्णांनी अनेक लोकांना मदत केली. विविध क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले. सामाजिक, राजकीय व शेतीविषयक आण्णांनी केलेले कार्य खूप मोठे आहे तसेच शिवणे शिक्षण प्रसारक मंडळाची केलेली स्थापना हे त्यांचे महान कार्य आहे.
यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना माजी जि.प.सदस्य व शिवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.बबनराव जानकर म्हणाले की, आण्णांनी अनेक निराधारांना आधार दिला. आण्णा च्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच सोनं झालं आण्णाला फसवण्याची कोणाची हिम्मत झाली नाही. स्वतःची जमीन गोरगरिबांना कमी किमतीत दिली. शेवटच्या क्षणी आपलं स्वप्न साकार झाल्याचा आनंद यांच्या डोळ्यात दिसत होता आण्णा आपल्या कार्याने महान झाले असे सांगून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला शिवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रकाश वाघमोडे, संचालक धनंजय घाडगे, उद्धव घाडगे, धोंडीराम जानकर, एकनाथ शिंदे गुरुजी, डॉ. संजय वाघमोडे यांच्यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. यशवंत नरळे सर यांनी तर आभार प्रा. कामदेव खरात यांनी मानले.