सांगोला महाविद्यालयांमध्ये क्रीडा सप्ताह संपन्न

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेची सुरुवात दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी कॉर्डिनेटर डॉ. राम पवार व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी कॉर्डिनेटर डॉ. राम पवार यांनी विद्यार्थ्यांना त्यांना खेळातून कशी बौद्धिक चालना मिळते याची सांगड घालत तीन एम कसे महत्त्वाचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
त्यामध्ये मन मनगट व मेंदू या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या एकत्रित आणण्यासाठी खेळ हा उत्तम प्रकार आहे. मग तो कोणत्याही प्रकारचा असो असे मत यावेळी व्यक्त केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना खेळामध्ये टाईम फॅक्टर किती महत्त्वाचा आहे. हे सांगताना वेगवेगळे उदाहरण देऊन आपल्याच महाविद्यालयातील विद्यार्थी विविध ठिकाणी विविध स्पर्धेला त्यास बरोबर विद्यापीठ राज्यस्तरीय व खेलो इंडियासारख्या स्पर्धेमध्ये भरारी घेत आहेत. याचीही उदाहरण मुलांच्या समोर दिली या क्रीडा सप्ताहामध्ये मुला व मुलींच्या मध्ये वैयक्तिक तसेच सांघिक प्रकाराच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने धावणे, भालाफेक, गोळा फेक, लांब उडी, हातोडा फेक व सांघिक या प्रकारांमध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रस्सी खेच, टेबल टेनिस, बॅडमिंटन या स्पर्धेचा समावेश होता. या सर्व स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून बक्षिसेही मिळवली. ही सर्व बक्षीसे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित करण्यात येतील. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागाचे संचालक प्रा. जगदीश चेडे व आभार डॉ. अमोल पवार यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभावी सूत्रसंचालन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली विद्यार्थिनी कुमारी श्रावणी धुकटे हिने केले.
महाविद्यालयातील हा वार्षिक क्रीडा सप्ताह पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील जिमखाना कमिटी सदस्य डॉ. मालोजीराजे जगताप, प्रा.वासुदेव वलेकर, डॉ.बबन गायकवाड, प्रा.राहुल शिंदे, प्रा.डी.एस.जंदळे, प्रा.एस.पी.लवटे, व श्री. विलास माने त्याचबरोबर महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी माजी विद्यार्थी या सर्वांचा हा सप्ताह पार पाडण्यामध्ये मोलाचा सहभाग होता.