फॅबटेक पॉलीटेक्निक कॉलेज मध्ये औद्योगिक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन शिबिर संपन्न

सांगोला: मेकॅनिकल अभियांत्रिकी क्षेत्र हे अभियांत्रिकी क्षेत्रातील रोजगार निर्मितीसाठी असणाऱ्या प्रमुख क्षेत्रापैकी एक अग्रगण्य क्षेत्र आहे . परंतु बदलत्या तंत्रज्ञानाने मॅकॅनिकल क्षेत्राला इलेक्ट्रॉनिक्स ,डेटा सायन्स , आर्टिफिशियल इंटिलिजन्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्याने विद्यार्थ्यानी केवळ मॅकॅनिकल क्षेत्राचा अवलंब न करता आपल्या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे असे प्रतिपादन श्री. स्वप्नील बंडगर यांनी केले.
फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज ने आयोजित केलेल्या मेकॅनिकल क्षेत्रातील करियरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले,मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय नरळे,प्रथमवर्ष विभागाचे विभागप्रमुख प्रा.अनिल वाघमोडे उपस्थित होते.पुढे बोलताना श्री.बंडगर यांनी ऑटोकॅड,कटिया,सॉलिड एज सारख्या कोअर मेकॅनिकल सॉफ्टवेअर मधिल करियर संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा.श्रीकांत बुरुंगले यांनी केले.हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर , कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.