महाराष्ट्र
सांगोला महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती सांगोला महाविद्यालयामध्ये 12 मार्च 2025 रोजी साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आणि विचारांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा. असे अवाहन महाविद्यालयातील कॉमर्स विभागातील प्राध्यापक प्रा.एस.डी.माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. प्रकाश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अमोल पवार व श्री. बाबासो इंगोले यांनी केले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.