सांगोला महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

सांगोला / प्रतिनिधी: सांगोला महाविद्यालय, सांगोला मध्ये शनिवार, ०८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनी व प्राध्यापिकांसाठी “महिलांसाठी व्यायाम काळाची गरज” या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा.सोनाली पाटील यांनी महिला दिन का साजरा केला जातो याचा इतिहास सांगितला. प्रमुख पाहुण्या मा. सौ. अश्विनी माने (संचालिका Glare Fitness Gym, सांगोला) यांनी व्यायाम व संतुलित आहार याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करत असताना त्यांनी “Fitness is not a destination it is a way of life हे तत्त्व” सांगितले. तसेच अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले सर यांनी समाजातील विविध क्षेत्रात महिलांनी केलेली कामगिरी व प्रगती सांगून महिलांचे धाडस व महत्त्व सांगितले. तसेच यावेळी सर्व महिला प्राध्यापिकांचे सत्कार करण्यात आले, यावर्षी विशेष प्राविण्य प्राप्त केल्या बद्दल डॉ.भाग्यश्री पाटील, प्रा.मयुरी चव्हाण व प्रा.तेजश्री मिसाळ यांचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा. डॉ. विद्या जाधव यांनी केला, तसेच सूत्रसंचालन प्रा. प्राप्ती लामगुंडे व आभार प्रदर्शन प्रा. प्रज्ञा काटे यांनी केले.