महाराष्ट्र

सांगोल्यातील धुळीचा 47 हजार नागरिकांना त्रास, दररोज हजारो वाहने उडवतात धुरळा. 

सांगोला शहर व उपनगरात नगरपरिषद अंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम सर्वत्र सुरू आहे त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते उखडून ठेवले आहेत शहरात नागरिकांना येताना आणि जाताना सर्वत्र प्रचंड धूळ उडते या उडणाऱ्या धुळीमुळे जवळपास 50 हजाराहून अधिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे जे नागरिक नियमित शहरांमध्ये कामानिमित्त फिरतात त्यांना दमा ,श्वसनाचे विकार वाढत आहे त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने सांगोला नगरपरिषदेकडे केली आहे.

सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेकरिता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होऊन काम प्रगतीपथावर सुरू आहे . शहरातील सर्वच भागात रस्ते खोदून या पाईपलाईनचे काम सुरू आहे पण हे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पूर्ववत चांगले रस्ते केव्हा होणार ?

असा प्रश्न शहरवासींमधून उपस्थित होत आहे. शहरामध्ये विविध कामानिमित्त तालुक्यातील ग्रामीण भागांमधून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते या समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास गेल्या सहा महिन्यापासून होत आहे तरी शहरातील सर्वच रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे तसेच 2 ते 3 महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल त्यावेळेस फार मोठी समस्या शहरात निर्माण होऊ शकते. यादरम्यान नगरपालिकेने नियोजन करून भविष्यात स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन उपाय योजना कराव्यात . भुयारी गटार योजनेच्या कामासाठी रस्ते खोदल्याने प्रचंड धूळ उडत आहे.नगरपालिका शहरातील सर्व नागरिकांकडून कर वसुली सक्तीने करते मग नागरी सुविधाही नगरपालिकेने तात्काळ पुरवून दररोजची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी कामटे संघटनेने केली आहे.


शहरात, गल्लीबोळात वाहन आले की धुळ उडते वाहन येताना आणि जाताना धुळ उडत आहे, त्यामुळे व्यापारी, रहिवासी प्रचंड नाराजी आहे, शहरात सर्वत्र धुळीचे लोक पसरले आहेत विनाम मास्क नागरिक शहरात फिरू शकत नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे दिवसातून हजारो वाहने शहरात फिरतात त्यावर उपाय योजना म्हणून दररोज दोन ते तीन वेळा सर्व शहरात पाणी मारून धुळीपासून नागरिकांची सुटका , व शहरातील सर्व रस्ते करण्याची मागणी शहरवासीयातून होत आहे.

निलकंठ शिंदे सर ,संस्थापक शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना, सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button