महाराष्ट्र

नाझरे सिटीसर्वे भूमापन कार्यालय असून अडचण नसून खोळंबा…

नाझरे ता सांगोला येथील सिटीसर्वे भूमापन कार्यालय सतत बंद असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे व त्यासाठी सांगोला येथे जावे लागते तरीही कामे होत नसल्याने हे कार्यालय सध्या असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

या भूमापन कार्यालयासाठी सुमारे नाझरे, बलवडी, अजनाळे, उदनवाडी, वाटंबरे, कोळे, लोटेवाडी जुनी व नवी, गोडवाडी, खवासपूर, यलमार मंगेवाडी, चोपडी, हातीद, पाचेगाव बुद्रुक, कारंडेवाडी, गुणापाचीवाडी, हटकर मंगेवाडी, कारंडेवाडी जुनोनी, बुद्ध्याळ, पाचेगाव खुर्द, राजुरी, तिप्पेहाळली, इत्यादी गावासाठी हे ऑफिस असून आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी उघडे असते व इतर दिवशी बंद असते यातच मंगळवार व शुक्रवार सुद्धा कार्यालय बंद असल्याने अनेक नागरिकांच्या बाहेर साहेब येथील म्हणून पाच सहा तास वाट पाहतात व निघून जातात. कार्यालय प्रमुख येणार नसतील तर तसा बोर्ड लावावा परंतु नागरिकांना काही समजत नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, संबंधिताचे याकडे अधिकच दुर्लक्ष होत आहे.

सध्या हे कार्यालय सुट्टी दिवस सोडून दररोज उघडे ठेवावे अशी नागरिकांची मागणी आहे व त्यामुळे अनेक गावचा उतारा काढण्याचे काम आगर इतरत्र कामे होतील. त्यामुळे सध्या तरी सिटीसर्वे कार्यालय असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button