महाराष्ट्र
फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन संपन्न

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि. कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्त्रियांचे क्षेत्र फक्त चूल आणि मूल एवढेच मर्यादित न राहता अथांग बनलेले आहे.समाजकारण,राजकारण, विज्ञान,शिक्षण,आरोग्य,शेती इ.अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत.या उंचीवर पोहचताना तिने स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा कधीही विसर पडू दिला नाही.नोकरी व घर सहज संभाळले .याच स्त्रीशक्तीचा सन्मान करण्यासाठी भारत सरकार ,नेहरु युवा केंद्र सोलापूर,व श्लोक बहुउद्देशीय सामाजिक संस्था देवळे व फॅबटेक पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूलमधील महिला शिक्षिकांसाठी महिला दिनाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे पाहुणे सौ.सुरेखा रूपनर, प्रा.सौ.प्रियंका पावसकर, स्कूलचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील, ए. ओ वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ.वनिता बाबर हे होते.मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी स्कूलचे शिक्षक श्री. पंचाक्षरी स्वामी यांनी स्त्रियांची विविध रूपे मनोगतातून व्यक्त केले. संगीत शिक्षक डॉ.अमोल रणदिवे यांनी भारतीय कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव व इतिहास सांगितला. तसेच श्री.आतिश बनसोडे सर व मृणाल राऊत मॅडम यांनी नृत्य सादर केले.प्राचार्य श्री.सिकंदर पाटील यांनी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महिला शिक्षिकांसाठी संगीतखुर्चीचे आयोजन केले होते. प्रथम क्रमांक सौ अश्विनी मोरे, द्वितीय क्रमांक सौ वनिता बाबर, तृतीय क्रमांक सौ प्रियंका मोहिते यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमासाठी श्लोक बहुउद्देशीय सामाजिक संस्था देवळेचे अध्यक्ष श्री.अविनाश जावीर सरांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ अमित रुपनर, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ संजय अदाटे यांनी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शितल बिडवे यांनी केले या प्रसंगी सर्व महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत्या.