महाराष्ट्र

सांगोला नगर परिषदेमार्फत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न*

सागोला नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 6, 7,व 8 मार्च 2025 रोजी विविध स्पर्धा, कार्यशाळा व प्रशिक्षण व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

•दिनांक 6 मार्च रोजी पाककला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धेत करिता प्रत्येकी र. रुपये 5 हजार, 3 हजार, व 2 हजार अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाकरिता ठेवण्यात आले होते. यापैकी पाककला स्पर्धेमध्ये श्रीम. अफरीन पठाण, विद्या तेली, माधवी खडतरे व रांगोळी स्पर्धेमध्ये श्रीमती रेश्मा दिवटे सुप्रिया दौंडे व गायत्री पाटणे अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय बक्षीसाचे मानकरी ठरले.

 

• दिनांक 7 मार्च रोजी महिलांच्या स्वयंरोजगारांच्या संधीमध्ये भर पडणेकामी ‘ केमिकल फ्री फ्रुट पल्प प्रिझर्वेशन व फ्लोरल ड्रिंक्स ( फुलांचे सरबत )’ या विषयावर गार्डन क्लब कोल्हापूर यांचे मार्फत प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते यामध्ये बचत गटांच्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

•दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन तसेच बक्षीस वितरण कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी व सौ.तनुजाताई गवळी, डॉ.सौ. निकिताताई बाबासाहेब देशमुख, लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सौ. राणीताई माने, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ.स्वातीताई अंकलगी, सांगोला शहराच्या स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ.नेहा साळुंखे पाटील, माजी नगरसेविका सौ.छायाताई मेटकरी, सौ.शोभाताई घोंगडे, सौ.रंजना बनसोडे, सौ.अप्सरा ताई ठोकळे तसेच कर्तव्यदक्ष शहर संघाचे अध्यक्ष सौ.सुनंदाताई घोंगडे इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी ‘सांगोला नगरपरिषदेमार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. यापुढेही महिलांसाठी स्वयंरोजगारासाठी व स्व- संरक्षणाणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा मानस आहे’ असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सौ.निकिताताई देशमुख यांनी ‘ महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत नेहमीच तत्पर असले पाहिजे’ व माजी नगराध्यक्ष सौ.राणीताई माने यांनी’ महिलांसाठीच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवून कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे ‘ असा मोलाचा सल्ला दिला. तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. नेहा साळुंखे पाटील यांनी ‘ महिलांनी आपले मानसिक आरोग्य जपावे व त्यासाठी त्यांनी छंद जोपासले पाहिजेत ‘ असा सल्ला सर्व महिलांना दिला.

होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांनी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाच्या विविध खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.अनुपमाताई गुळमिरे यांनी केले. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे मानाच्या पैठणीचे मानकरी सौ.प्रियांका भंडारे, सौ.पल्लवी कांबळे व सौ.मनीषा दिघे अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकाने विजयी ठरले.तसेच पाककला व रांगोळी स्पर्धेत विजेते व सहभागी या सर्वांना बक्षीस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी सांगोला नगर परिषदेचे कर व प्रशासकीय अधिकारी श्रीमती अस्मिता निकम, कर निरीक्षक श्रीमती प्रियांका पाटील, श्री.रोहित गाडे, कार्यालय अधीक्षक श्री.सचिन पाडे, श्री.योगेश गंगाधरे व नगरपरिषदेचे विभाग प्रमुख इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button