महाराष्ट्र
सांगोला तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरू करावे-रवींद्र कांबळे.

सांगोला तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रे तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी बहुजन समाज क्रांती संघटने संस्थापक अध्यक्ष व पत्रकार रवींद्र कांबळे यांनी सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की, विविध प्रमाणपत्राचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले यास प्रतिज्ञापत्र, सातबारा हे महा-ई-सेवा केंद्रांमार्फत दिली जातात. तहसील समोरील व इतर केंद्र चालक वाजवी दरापेक्षा जास्त प्रमाणात पैसे घेतात. प्रमाणपत्र वितरीत करण्यास अडवणूक करून आर्थिक लुबाडणूक करतात व प्रमाणपत्रही वेळेवर दिले जात नाही, त्यामुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना, खूप मोठा त्रास होत आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे सांगोला तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्यात यावे. जेणेकरून जनतेची लुबाडणूक न होता शासनाने निश्चित केलेल्या वाजवी दरामध्ये व विहित मुदतीत जनतेला विविध प्रमाणपत्रांचे दाखले मिळतील. त्यामुळे सांगोला तहसील आवारातील शासनाचे सेतू सविधा केंद्र सुरू करावे,अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी मागणी करण्यात आली आहे.